पुणे-बँकॉक येथे इंडियन आर्ट कल्चरल सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत तुकाई दर्शन हडपसर येथील वैष्णवी सुनिल औरसंग हिने मोठ्या गटात एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला . प्रसिध्द कथ्थककार पदमविभूषण पंडित बिरजू महाराज यांची नात इंडियन क्लासिकल डान्सर सिंजींनी कुलकर्णी यांच्याहस्ते वैष्णवी सुनिल औरसंग हिला स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले .
वैष्णवी गेली १२ वर्षे नृत्य करत असून भरतनाट्यमचा विद्यापीठाचा पदविका अभ्यास पूर्ण केलेला असून , अखिल भारतीय महाविद्यालयाचा विशारदचा अभ्यास चालू आहे . वैष्णवीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे मिळविली आहेत .
वैष्णवीची आई अश्विनी या पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत कार्यरत असून तिचे वडील सुनिल हे अभियंता म्हणून कार्यरत आहेत . आपल्या आई वडिलांच्या पाठबळामुळे आपण हे यश मिळविले .
तिला गरजू होतकरू मुलांना नृत्य शिकविण्याची आवड आहे . त्यासाठी तिने काळेपडळ येथे वैष्णोमुद्रा अकँडमी सुरु केली असून अकँडमीच्या माध्यमातून ती मुलांना नृत्याचे धडे देत आहे . ती स. प. महाविद्यालयात कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत असून तिला नृत्यात करिअर करायचे असल्याचे तिने सांगितले . तिला जपानी भाषा देखील अवगत आहे .