पुणे- कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि भाजपचे आमदार योगेश टिळेकर हे विधानसभेच्या तोंडावर येथे एका व्यासपीठावर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा उसळली होती .हे दोघे नेते माळी समाजाचे आहेत आणि हडपसर विधानसभा मतदार संघातील आहेत .
महालक्ष्मी निधी लिमिटेडची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली . वानवडीमधील युटोपिया सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या पहिली वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक पोपटराव बोराटे , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , आमदार योगेश टिळेकर , श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे चेअरमन संतोष जाधव , नगरसेविका कालिंदी पुंडे , जनसेवा सहकारी बँकेचे संस्थापक संचालक रघुनाथ कचरे व सर्व संचालक वर्ग उपस्थित होते .
या सभेचे प्रास्ताविक, उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक सुधीर होले यांनी केले तर अहवालवाचन श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक राजू सातव यांनी केले तर वार्षिक आढावा श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे चेअरमन संतोष जाधव यांनी घेतला तर आभार श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे संचालक राजेंद्र कामठे यांनी मानले .
श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडचे चेअरमन संतोष जाधव यांनी सांगितले कि , श्री महालक्ष्मी निधी लिमिटेड हि २७ डिसेंबर २०१८ रोजी स्थापना असून तळागाळातील नागरिक , छोटे व्यावसायिक यांना सुलभ पद्धतीने तारण कर्जे उपलब्ध करून दिली जातात , त्यामुळे ठेवी या सुरक्षित असतात . तसेच जेष्ठ नागरिकांना ठेवीवर जादा व्याजदर दिला जातो .श्री महालक्ष्मी निधी लिमिटेडमध्ये ४५ लाखपर्यंत ठेवी जमा असून ३७ लाख रुपयांची कर्जे दिलेली आहेत . भागधारक ३६० असून वार्षिक उलाढाल ८१ लाख रुपयांची आहे . अंदाजे वार्षिक नफा २ लाख रुपये आहे . यावेळी ताळेबंदाचे वाचन करून सभासदाना माहिती देण्यात आली .
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले कि , श्री महालक्ष्मी निधी लिमिटेड हि गोरगरिबांना कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळे गोरगरिबांसाठी आधारवड आहे . गरजू लोकांना त्यांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी नेहमीच या संस्थेचा पुढाकार असतो .