पुणे-मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश गायकवाड मित्र परिवाराच्यावतीने ससून रुग्नालयातील सोफोश या सामाजिक संस्थेस आर्थिक मदत व लहान मुलांना फळे व बिस्किटांचे वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला . संस्थेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक , माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे , नगरसेवक महेशभाऊ लडकत , नगरसेवक योगेश समेळ , नगरसेवक आदित्य माळवे , नगरसेविका मंजुश्री खर्डेकर , नगरसेविका पल्लवी जावळे , भाजप नेते संदीप खर्डेकर , माजी नगरसेवक दिलीप उंबरकर , स्वीकृत नगरसेवक अरविंद कोठारी , उध्दव मराठे , जयप्रकाश पुरोहित , रिपाई युवक नेते निलेश आल्हाट , कैलास पिसाळ , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , पुरुषोत्तम पिल्ले , किशोर कुटे , गोरख दुपारगुडे , शिरीष कुलकर्णी , भिकन सुपेकर , विशाल कोंडे , शुभांगी वैरागे , नाना तांबे , दत्तात्रय दरेकर, सागर शेंडगे , नितीन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले कि , कुठ्ल्यायीही नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक संस्थांना मदत करून करण्याचे प्रशंसनीय काम सतीश गायकवाड करत असून सर्वानी यांचे अनुकरण करावे .
यावेळी माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , छत्रपती शाहू महाराज यांचे वारस असलेली मालोजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा होत आहे . ज्या छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील दिन दलितांसाठी आयुष्य वेचले . त्यांच्या वारसाच्या वाढ दिवसानिमित्त एक आदर्श पायंडा पाडला आहे .
यावेळी भाजप नेते संदीप खर्डेकर यांनी सांगितले कि , भाजपने संभाजी राजे यांना खासदार केले आता मालोजीराजे छत्रपती यांना आमदार करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
यावेळी सोफोश संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी शर्मिली सय्यद यांच्याकडे दिलीप कांबळे यांच्याहस्ते मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते .
मालोजीराजे छत्रपती यांच्यावर माझी नितांत श्रद्धा असून छत्रपती शाहू महाराज यांच्याप्रमाणेच मालोजीराजे देखील सामान्य जनतेसाठी कार्यरत असतात ,त्याच्यातील विनम्रता हा त्यांच्यातील मोठेपणा असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक सतीश गायकवाड यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे आयोजन सतीश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर आभार दिलीप उंबरकर यांनी मानले .