पुणे-शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळातर्फे भारतातील अकरा संताच्या पादुका ( साईबाबा , स्वामी समर्थ , गजानन महाराज , शंकर महाराज , रामास्वामी, टेबे स्वामी , रामदास स्वामी , ज्ञानेश्वर महाराज , दत्त गुरु करुणा पादुका ) तसेच सुवर्ण दत्त गुरु आणि पारद शिवलिंग अशा या चैतन्यमय संतांच्या पादुकांच्या व हस्त स्पर्शित वस्तूंच्या दर्शनाचा लाभ सर्व भाविकांनी होण्यासाठी ” चैतन्यस्पर्श सोहळा ” सिध्द हस्त योगी स्वामी उमेशानंदजी (हिमालयवासी)यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळ , स्वामी ध्यान कुटी , पुणे येथे होत आहे .
आज पहिल्या दिवशी सर्व पादुकांची नगर प्रदक्षिणा श्री साई रथातून शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळापासून ओंकारेश्वर मंदिर , रमणबाग ,केसरी वाडा वरून पुन्हा मुठेश्वर मंडळापाशी झाली .
बुधवार दिनांक २९ मे २०१९ रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत हा ” चैतन्यस्पर्श सोहळा ” चालू राहणार आहे . सकाळी १० वाजल्यापासून अखिल भारतीय स्तरावरील गायक शैलेंद्र भारती , अजित कडकडे , देवेंद्र गंगाणी , शेखर खांजो , व्हायोलिन वादक जोहर अली यांची गायन सेवा सादर करण्यात येणार आहे . तसेच याचदिवशी महाप्रसाद , भजन , कीर्तन देखील होणार आहे . संध्याकाळी ८ ते ८.३० वाजता फ्युजन संगीताद्वारे ओंकार नादाची विश्वनादानुभूती सादर करण्यात येणार आहे .