एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस
पुणे, दि.१४ फेब्रु.भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी) गोवा यांनी ०९ ते ११ फेब्रुवारी २०२३ आयोजित केलेल्या सिफेस २३ एक्स अथर इलेक्ट्रिक टू व्हीलर डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग स्पर्धेत भारतातून आलेल्या २५ संघांनी सहभाग घेतला होते. या स्पर्धेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेच्या संघाने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून रु. ३००००/- चे पारितोषिक पटकाविले आहे.
इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज असून या स्पर्धेमधून विध्यार्थाना इलेक्ट्रिक वाहन बनविताना येणार्या सर्व सुरक्षा प्रणालींचे चे प्रयोजन करणे बंधनकारक असते. १ किलो वॅट मोटर, ३० अँपिएर ४८ वोल्ट ची बॅटरी वापरून हे वाहन बनविण्यात आले आहे. या वाहनात अल्कोहोल डिटेक्टर सेन्सर, क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस ब्रेकींग अशीविविध अत्याधुनिक प्रणाली बसविण्यात आल्या आहेत.
अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील ज्ञान, संघटन कौशल्य, प्रकल्प नियोजन, आर्थिक नियोजन इत्यादी गोष्टी आत्मसात होतात. भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी) चे प्राध्यापक आणि अथर या कंपनीचे चे इंजिनिअर्स यांच्या कडून या इलेक्ट्रिक टू व्हीलर डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंगचे मूल्यांकन स्टॅटिक व डायनॅमिक अशा दोन उपविभागात केल्या गेले. संघ प्रमुख सिद्धांत देशमुख, उप संघ प्रमुख अतुल झा, सदस्य प्रणव जाधव, मयुरेश ओक, दीपेश चारथड व संघाचे इतर सदस्य यांनी अत्यंत कुशाग्रतेने हि गाडी बनविताना अथक परिश्रम घेतले. यांना संघाचे सल्लागार प्रा. आशिष पवार व प्रा. निलेश बिराजदार आणि प्रा. प्रल्हाद पेसोडे याचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ.आर.एम. चिटणीस, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. गणेश काकांडीकर, उप विभाग प्रमुख डॉ.दीपक हुजरे आणि डॉ. कुंडलिक माळी व अधिष्ठाता डॉ. दिनेश सेठ यांनी अभिनंदन केले.