पुणे: इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांची जयंती नुकतीच साजरी झाली. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील “सुफी वारकरी विचार मंच”च्या वतीने शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे येथील डॉ. ए. आर. शेख असेंम्बली हॉलमध्ये ह. पैगंबरांनी सांगितलेल्या मानवता धर्मावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम आझम कॅम्पस व एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या परिसंवादासाठी अजमेर येथील गरीब नवाज यांच्या वंशातील हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती उपस्थित राहणार आहेत. परिसंवादामध्ये विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पारनेर येथील डॉ. रफीक सय्यद, माजी आमदार श्री. उल्हासदादा पवार व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण आपले विचार मांडणार आहेत.
यावेळी अभिनव कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजीव जगताप, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर श्री. तात्या कदम, ह.भ.प. मच्छींद्र महाराज लांडगे (चापडगांवकर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व सुफी वारकरी विचार मंचचे पदाधिकारी
श्री. मशकुर ए. शेख, उमर शरीफ मो. शेख, रईस चाँद शेख व नितिन गोरावडे यांनी दिले आहे.