पुणे – देशात दूध उत्पादनाची श्वेत क्रांती करून दाखवणारे डॉ. वर्गिस कुरीयन यांची जन्मशताब्दी आणि अमूलच्या 75 वर्षानिमित्त आज “अमूल सायकलोथॉन, पुणे” चे (सायकल रॅली) आयोजन करण्यात आले होते. यात वयवर्षे 9 ते 76 वयोगटातील सुमारे 250 हौशी सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. यातील ज्येष्ठ सायलकपटूसह 12 तरूण सायकलपटूंना यावेळी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या सायलक रॅलीचे आयोजन अमूल (गुजरात को – ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडऱेशन लिमिटेड) यांनी केले होते.
वैकुठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को – ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (व्हॅम्नीकॉम) संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव यांनी आज सकाळी ७ वाजता हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. पुणे विद्यापीठाजवळील व्हॅम्नीकॉम येथून सुरू झालेली रॅली संचेती हॉस्पिटल, मॉर्डन कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन कॉर्नर, अलका टॉकीज चौक, दांडेकर पूल, मित्रमंडळ चौक, लक्ष्मी नारायण थिएटर, सातारा रस्त्याने कात्रज डेअरीत पोचली. या 15 किलोमीटरच्या मार्गावर अमूलच्या कर्मचा-यांनी व स्थानिक नागरीकांनी चौकाचौकात रॅलीचे स्वागत केले.
कात्रज डेअरीत रॅलीचा समारोप झाला. तेथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी सायकलपटूंना
स्मृतीचिन्हं देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र ऍथटलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय छाजेड, कात्रज डेअरीचे अध्यक्ष ऍड विष्णूकाका हिंगे, संचालक गोपाळराव म्हस्के यांच्या हस्ते रॅलीतील 12 जणाना गौरवचिन्हं व गिफ्ट हॅम्पर देऊन गौरवविण्यात आले. यावेळी ऍड हिंगे, म्हस्के व छाजेड यांनी डॉ. कुरीयन यांनी दूधाची क्रांती कशी केली याची महिती उपस्थितांना दिली. जगात आपला देश दूध उत्पादनात अग्रेसर कसा झाला हे सांगितले. या रॅलीचे संयोजन अमूलचे महाराष्ट्र गोवा विभागाचे झोनल मॅनेजर अतुल सुरू , महाराष्ट्र गोवा विभागाचे आकाऊंटस व कमर्शियल झोनल मॅनेजर आनंद चहांदे व त्यांच्या सहका-यांनी केले होते.