आबा बागुल यांचा पुढाकार अखेर लागेल सार्थकी!
पुणे -लकडी पुलावरील मेट्रोचा पुल गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरू नये म्हणून…मेट्रोच्या पुलाची उंची हवी तेव्हा वाढवता येइल म्हणजे हा पुल विसर्जन मिरवणूक येताच आणखी उंचीवर नेऊन मिरवणूक सुरळीत पणे पुढे जाऊ देता येइल यासाठी हा पुल उभारण्यासाठी प्रारंभी हालचाली सुरू झाल्या आहेत या साठी आज पुणे मेट्रोने मीटिंग आयोजित केली होती या मीटिंग साठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्याच बरोबर आर्किटेक्ट राजीवडे आणि सोबत पुणे मनपा अधिकारी उपस्थित होते मेट्रोचा हा पुल कसा असेल याचे सादरीकरण करण्यात आले लवकरच ह्या पुलाचे काम देखील चालू होईल अशी आशा आहे यासाठी पुणे मेट्रो देखील सहकार्य करीत आहे
मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा पुल लवकरात लवकर कसा होईल याकडे लक्ष वेधले आहे मेट्रोचे काम देखील वेळेत पूर्ण होणार आहे त्याच बरोबर पुणे शहराची संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेली गणेशोत्सव मिरवणूक देखील तेवढ्याच दिमाखदार पणे सुरू राहणार आहे यासाठी आबा बागुल गटनेते काँग्रेस पक्ष पुणे मनपा आणि पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा पूल उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे