पुणे-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मेटेंचे अपघाती जाणे आणि त्याहुनी आपल्याकडील अब्जावधींच्या टोल ची वसुली करून मस्तीने बेफिकिरी वृत्तीने वागणाऱ्या ठेकेदारी व्यवस्थांच्या उघड झालेल्या बेजबाबदार पद्धतीमुळे त्यांना अपघातानंतर देखील तासभर मदत न मिळण्याचा प्रकार उघड होणे यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे . संताप आणणारी रस्तोरस्ती टोल गोळा करणारी टोल धाड आक्रमण केलेय इंग्रजांप्रमाणे वागू लागली कि काय ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला बोचल्याशिवाय राहावेनासा झाला आहे.
मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता, जगाला हेवा वाटावा असे शिवस्मारक व्हावे यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा आवाज माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते.बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण वाटेत त्यांना काळाने गाठले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रायगडच्या हद्दीत त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर सुमारे तासभर त्यांना मदतच मिळाली नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे.
अपघातानंतर एक तासभर कुणाचीही मदत नाही
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी माध्यमांना सांगितले की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथे रुग्णवाहिका आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आले नसल्याचे कदम यांनी सांगितले. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असे कदम म्हणाले.
मेटेंच्या डोक्याला गंभीर दुखापत
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
मराठा समाजासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. मात्र या दरम्यान मेटे यांच्या गाडीला अपघात झाला या अपघातानंतर दोन तास कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा अपघात झालाय की घातपात झाला हे सरकारने तात्काळ जाहीर करावे. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे.
अपघात हे सांगून होत नसतात, परंतु ते टाळणे अथवा झाल्यास इजा होऊ नये व कमीतकमी व्हावी यासाठी मात्र आपण काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच अपघात झाल्यास त्वरित काय उपचार करावेत हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अपघात झाल्यावर कोणताही व्यक्ती रुग्णवाहिकेला किंवा पोलिसांना फोन करून माहिती देऊ शकतो. ज्या व्क्तीयचा अपघात झाला आहे. त्याला पोलिस कोणत्याही प्रकारची विचारणा करणार नाही. त्यामुळे अपघातस्थळी आपण मदत करणे हे गरजेचे आहे.
माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महामार्ग पोलिस प्रभारी गणेश बुरकूल यांनी सांगितले की, अपघात झाल्याच्या अवघ्या सात मिनीटात मी घटनास्थळी पोहोचलो.
मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मेटे यांच्या या अपघाताबाबत महामार्ग पोलिस प्रभारी गणेश बुरकूल यांनी सांगितले की, अपघात झाल्याच्या अवघ्या सात मिनीटात मी घटनास्थळी पोहोचलो.
विनायक मेटे यांचा अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांना पहाटे 5.58 वाजता मिळाली. त्याक्षणी आम्ही धाव घेत 6.05 वाजता घटनास्थळी पोहोचलो. त्यानंतर आम्ही मदतकार्याला सुरुवात झाल्याची माहिती, गणेश बुरकूल यांनी दिली. Endeavour MH 01 DP 6364 या गाडीतून ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. एकनाथ कदम हा त्यांचा नेहमीचा चालक गाडी चालत होता.
मुंबईकडे दुसऱ्या लेनने जात असताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सोटल्याने गाडी पुढील वाहनाला धडकली. त्यात विनायक मेटे गंभीर जखमी झाले. त्यांना आयआरबी अॅम्बुलन्सने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. अपघातातील जखमी बॉडीगार्ड व पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून त्यांना बाहेर काढून त्यांनाही रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.