पुणे २६: संसदेच्या अंदाज समितीचे सदस्य आज पुण्याच्या अभ्यास दौऱ्यावर होते. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी त्यांचे पुण्यात स्वागत केले.आज सकाळ पासून त्यांनी विविध बैठका घेतल्या. तसेच त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट तसेच पुणे विमानतळाला भेट दिली.
या समिती मध्ये खासदार श्री. राजीव प्रताप रूडी, श्री. पी. पी चौधरी, श्री. संजय जयस्वाल, श्री जुगल किशोर शर्मा, श्री. धर्मेंद्र कुमार कश्यप, श्री निहाल चांद चौहान, श्री सुदर्शन भगत, श्री मागून्ता श्री निवासुलू रेड्डी या सदस्यांचा समावेश होता.
पुणे भेटीत त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लसी विषयी अधिक माहिती घेतली. त्याच प्रमाणे पुणे विमानतळाला भेट देऊन पुणे विमानतळाच्या समस्या जाणून घेतल्या.