सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची भावना
पुणे – स्थायी समितीच्या बैठकामध्ये काय काय होते ? कोन कोणावर मात करते आणि कोण कोणाला साथ देते याचे गुलदस्ते उघडण्यासाठी खलबते होऊन ती राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचत असताना , गटनेत्यांच्या मागण्या होत असतानाही मुख्य सभा आणि सभेचे कामकाज मात्र गोपनीय पद्धतीने च व्हावे यादृष्टीने ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे .
मुख्य सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातून घ्यावी अशी मूळ मागणी कार्यकर्ते आणि पुणेकारांची आहे , ऑनलाइन सभा सुरु झाल्यावरही त्या या सभागृहातून घेतल्या गेल्या, पण तरीही या पब्लिक साठीडिजिटल मीडिया द्वारे ऑन लाइन खुल्या राहतात, गोपनीयता राहत नाही, हे लक्षात आल्यावर या सभा महापौरांच्या अतिविशेष दालनातून कंडक्ट करण्यात येऊ लागल्या, या मुळे निव्वळ गटनेते आणि सत्ताधारी पदाधिकारी यांचा सुसंवाद राहिला . सभागृहातून होणारी नगरसेवकांची मुस्कटदाबी पब्लिक ला दिसत होती, ती इथे एन्टीचेम्बर च्या दालनातून बाहेर पडू शकली नाही . कोरोना च्या भितिखाली झालेल्या सर्व सभा मोठ्या गोपनीय पद्धतीने झाल्या. आता सर्व सुरळी त झाले आहे असे सांगत मंदिरासाठी घंटा नाद होतो पण मुख्य सभे साठी सभेच्या पारदर्शक कारभारासाठी मात्र काही केले जात नाही ही खंत व्यक्त होते आहे. मुख्य सभा ऑन लाइन घ्या अथवा ऑफ लाइन पण त्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातून घ्या म्हणजे कारभार आम्हालाही कळेल असे कार्यकर्त्यांसह पुणेकरांचे म्हणणे आहे, देव दर्शन ऑन लाइन तशी मुख्य सभा तरी ऑन लाइन दिसू देणार की नाही हे मात्र महापालिकेतील भाजपा पदाधिकारी ठरवनार आहेत .