पारंपारिक औषधींचे शास्त्रशुद्ध संशोधन करण्याची गरज : डॉ. विजयमोहनन पील्लई
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘रसायनशास्त्र विभागा’तर्फे ‘हर्बल अॅन्ड सिंथेटिक ड्रग स्टडिज्’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गुरूवारी डॉ. विजयमोहनन पील्लई (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे चे संचालक) यांच्या हस्ते आणि एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. पील्लई म्हणाले, ‘हर्बल उत्पादने वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या उत्पादनांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या पारंपारिक माहितीचे शास्त्रशुद्ध संशोधन करण्याची गरज आहे. ’
पी. ए. इनामदार म्हणाले, ‘वनौषधींबद्दल आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या सहकार्याने अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतील.’
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘अॅब्स्ट्रॅक्ट बुक’ चे देखिल प्रकाशन डॉ. विजयमोहनन पील्लई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, जॉर्ज वेनर (लोवा विद्यापीठाच्या होल्डेन कॉम्प्रीहेन्सीव्ह कॅन्सर सेंटरचे संचालक), रॉय जेन्सन (कन्सास कॅन्सर सेंटर विद्यापीठाचे संचालक), श्रीकांत अनंत (कन्सास मेडिकल सेंटर, युएसए चे सहअधिष्ठाता), टीमोथी स्टेमलर (व्हेन स्टेट विद्यापीठ, युएसए), इझ्टॉक ट्युरेल (सोल्व्हेनिया विद्यापीठ), डॉ. किरण भिसे (प्राचार्य, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. ई. एम. खान (प्राचार्य,आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष पाध्ये यांनी केले तर खुर्शीद अहमद यांनी आभार मानले. या परिषदेचे हे तिसरे वर्ष आहे. कन्सास विद्यापीठ (अमेरीका) अनुदान आयोगाच्या सहकार्याने ही परिषद होत आहे. याशिवाय ‘इंटरडिसिप्लनरी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी रिसर्च अॅकॅडमी’, ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’चाही या आयोजनात सहभाग आहे.
दिनांक 7 जानेवारी रोजी सुरू झालेल्या या परिषदेचा समारोप दिनांक 9 जानेवारी रोजी होईल. परिषदेमध्ये वनौषधी, सिंथेटिक ड्रग्स्, नवीन प्रवाह, युनानी औषधे, बायोऑरगॅनिक ड्रग्स् अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. संशोधक, वैज्ञानिक, शैक्षणिकज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यात अमेरिका, युरोप, इंग्लंड, मॉरिशस, इराण, भारतातील तज्ज्ञांचा समावेश आहे.