पुणे- अनेक नेते ,अभिनेते यांनी महापालिकेकडे थोर विचारवंत ,नेते यांचे पुतळे महापालिकेकडे देऊन ठेवलेत. पण हे सारे पुतळे आहेत तरी कुठे? राम गणेश गडकरींचा पुतळा महापालीकेला देणारे महापौरांसमवेत च वावरतात पण मग त्यांचा पुतळा बसविण्यासाठी त्यांनी तेव्हा केलेली आंदोलने ‘तो ‘आग्रह नंतर कुठे गेला . उपमहापौरपदावर कार्यरत असताना असाच एक आग्रह आणि प्रस्ताव सध्याचे कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मंजूर करवून काम हि सुरु केले होते . पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस आणि पहिले महापालिका आयुक्त स. गो बर्वे यांचे पुतळे महापालिका आवारात बसविण्याचा संकल्प केला होता. त्यांनी महापालिकेला पुतळा हि दिला. चौथरे देखील बांधून झाले, पण पुढे…हे सारे काम गेली ६ वर्षे तसेच रेंगाळले आहे. … का राहिले हे काम अधुरे ..याबाबत कोणाकडे काहीही उत्तरे नाहीत …स्वतः आबा बागुल यांनी व्यक्त केलेली खंत आणि आता पुन्हा केलेली मागणी …. पहा ऐका …