हडपसरच्या कचरा प्रश्नावर आंदोलनाची पराकाष्ठा
पुणे- महापालिकेतील नव्या इमारतीत वाढलेल्या ‘अँटीचेंबर्स बैठकांमुळे ‘ आज हडपसरच्या 2 नगरसेवकांना हडपसरला कचरा डेपो नको हे आंदोलनात्मक पद्धतीने महापौरांपुढे सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली . राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि अशोक कांबळे यांनी या साठी मोठी पराकाष्ठा केली . अखेरीस त्यांना या बैठकीत प्रवेश मिळाला आपले गार्हाणे मांडता आले. पण यश मात्र कितपत मिळेल हे देवभरोसे सोडून माघारी परतावे लागले. हडपसर येथे कचरा डेपो नको म्हणून गेली कित्येक वर्षे येथील नगरसेवक ससाणे झटत आहेत . सातत्याने ते आंदोलने करीत आहेत. आजच्या आंदोलनाने त्यांना महापालिकेतील बैठकांमध्ये जाण्यास ,महापौरांपुढे जाण्यास किती अनंत दरवाजे अनंत अँटीचेंबर्स पार कराव्या लागतात हे स्पष्ट दिसून आले. एवढ्या महत्प्रयासाने प्रवेश मिळवून देखील महापालिकेतीलअनेक विषयांवर संबधित नगरसेवक किंवा पदाधिकारी , अधिकारी यांच्या बैठका पारदर्शकपणे होण्याचे दिवस संपुष्टात आल्याच्या चित्रावर शिक्कामोर्तब झाले आहे. पहा या आंदोलनाची हि अर्थात दरवाजापर्यंत ची झलक ….