पुणे;- श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबा पालखी सोहळा २०१९ आयोजित केला आहे . शुक्रवार दि. ५ जुलै २०१९ रोजी सकाळी ९ वाजता कसबा गणपती मंदिर येथून प. पु. श्री रमेश गिरीजी महाराज बेट कोपरगाव यांच्या शुभहस्ते श्री रविसेठ सांकला , रविराज ग्रुप , यांच्या उपस्थितीत व खासदार गिरीश बापट , पुणे , आमदार माधुरीताई सतीशसेठ मिसाळ , शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे पाटील , श्री साईबाबा संस्थांनचे कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगलीकर , पुणे महापालिका भाजपचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत श्री साईबाबा पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे नगर मार्गे प्रस्थान होणार आहे . हा सोहळा रविवार दि. १४ जुलै २०१९ रोजी शिर्डीस पोहचेल .
या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या पालखीत व्यसनमुक्तीचे उपक्रम राबविले जातात . तसेच , स्वछ भारत अभियानांतर्गत स्वछतेसाठी दहा लाख रुपये किमतीचे तीन आधुनिक मोबाइल टॉयलेट्स समितीने पालखीबरोबर घेतले आहेत . या पालखीत महाराष्ट्राच्या विविध भागातील साईभक्त सहभागी होतात . साईबाबा साईरथ आधुनिक सुसुविधांनी तयार आहे . सध्या साईरथाचे सजावट व पॉलिशचे काम पूर्ण होत आले आहे .