… तर, यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील : खासदार संजय काकडे
पुणे : भारतीय जनता पक्षाची पुणे शहरातील ताकद मोठी आहे. त्यामुळे सत्ता असो अथवा नसो, प्रभाग असो की वॉर्ड आपण सर्वांनी जनतेची व शहराच्या विकासाची कामे केलीत तर, पुणे महापालिकेत पुन्हा आपलीच सत्ता येईल. यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, अशी भूमिका भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज मांडली.
भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड झाली. भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. यावेळी खासदार संजय काकडे बोलत होते. जगदीश मुळीक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खा. काकड़े, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पक्षाचे आमदार व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.