पुणे- अखेरीस पोलिसांनी आज गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रथांच्या उंचीवर मर्यादा घालणारे आदेश काढले आहेत . मेट्रो चे नियोजन करताना मेट्रोच्या पुलाची आणि स्थानकाच्या उंचीबाबत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रथाचा विचार डावलल्याने आणि आपल्याच विचारानुसार उंची ठेवून मेट्रोचे बांधकाम केल्याने या मर्यादा आता पुण्यातील विसर्जन मिरवणूक रथांना पाळावयाच लागणार आहेत .लकडी पुलावर २१ फुट उंचीवर मेट्रोचा पूल असल्याने आता येथे विसर्जन मिरवणूक रथ १८ फुट उंचीपर्यंतच असेल तरच येथे मिरवणूक रथांना एन्ट्री असणार आहे. कर्वे रस्त्यावरील मेट्रो स्टेशन ची उंची १८ फुट उंच आहे आणि मेट्रो ओव्हर ब्रिज ची उंची १७ फुट उंच आहे आणि येथी सर्विस रोड ची रुंदी १५ फुट आहे यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या रथांना आपली रुंदी १२ फुटापर्यंतच ठेवावी लागणार आहे आणि रथांची उंची १६ फुटापर्यतच ठेवावी लागेल तरच या रस्त्यावरून मिरवणुकीस परवानगी दिली जाणार आहे.आज याबाबत डेक्कन पोलिसांनी आदेश जारी केले आहेत .