पुणे,1 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत एस्.एस्.अकादमी संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
ए.के स्पोर्ट्स क्लब साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आलोक लोढाच्या दमदार फलंदाजीच्या बळावर एस्.एस्.अकादमी संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळाताना अर्जुन शेटेच्या अचूक फलंदाजी पुढे प्राधिकरण जिमखाना संघ 20 षटकात 5 बाद 100 धावात गारद झाला विहान शर्माने 29 धावा संघाच्या डावाला आकार दिला. 100 धावांचे लक्ष एस्.एस्. अकादमी संघाने केवळ 14.4 षटकात 2 गडी गमावत 102 धावांसह पुर्ण केले. आलोक लोढाने 51 चेंडूत 11 चौकारांसह 64 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आलोक लोढा सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरीप्राधिकरण जिमखाना- 20 षटकात 5 बाद 100 धावा(विहान शर्मा 29(36, 6×4), आर्य भुरसे 10(14, 1×4), अर्जुन शेटे 3-13, जय पांडे 1-22) पराभूत वि एस्.एस्. अकादमी- 14.4 षटकात 2 बाद 102 धावा(आलोक लोढा 64(51, 11×4), अनिश मोहोळकर 10(15, 1×4), विहान शर्मा 1-5, अरूष गुप्ता 1-6) सामनावीर- आलोक लोढा; एस्.एस्.अकादमी संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.