पुणे, दि.12 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत पार्थ सोनावणे(3-8)याने केलेल्या चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने सेकंद क्रिकेट अकादमी संघाचा 7 गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमीच्या पार्थ सोनावणे(3-8), दिप पाटील(1-12) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे सेकंड क्रिकेट अकादमीचा डाव 20 षटकात 9बाद 62धावावर कोसळला. यात मयुरेश मुदगल 16, सर्वज्ञ कुलकर्णी 14यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने 9.2षटकात 3 बाद 63 धावा करून पूर्ण केले. यात अमन शेखने नाबाद 27धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:सेकंड क्रिकेट अकादमी: 20 षटकात 9बाद 62धावा(मयुरेश मुदगल 16, सर्वज्ञ कुलकर्णी 14, पार्थ सोनावणे 3-8, दिप पाटील 1-12) पराभूत वि.चंद्रोस क्रिकेट अकादमी: 9.2षटकात 3 बाद 63 धावा(अमन शेख नाबाद 27(24,4×4), पार्थ सोनावणे 8, समिक्षा कुलकर्णी 1-15, भावेश चौधरी 1-14);सामनावीर-पार्थ सोनावणे; चंद्रोस क्रिकेट अकादमी संघ 7 गडी राखून विजयी.