पुणे-कोथरूड मतदारसंघातील हॅपी कॉलनी व गोसावी वस्तीतील नागरिक काही असामाजिक तत्वांमुळे त्रस्त झाले असून तेथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत हॅपी कॉलनी फेडरेशन चे चिन्मय गोगटे, अवधूत जोहारी, शांभवी गारगोटे ,सौरभ अथनीकर,हिमाली पटवर्धन , रोहित पटवर्धन,भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस व स्थानिक नगरसेवक दीपक पोटे, शिक्षण समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, महिला बाल कल्याण समिती अध्यक्ष माधुरी सहस्त्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी इ मान्यवर उपस्थित होते.
शिष्टमंडळाच्या वतीने आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी तेथील नागरिकांचे गाऱ्हाणे मांडले व तेथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी प्रकर्षाने मांडली. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व त्वरित चौकी कार्यान्वित करण्यात येईल असे सांगितले. ह्या चौकीसाठी आम्ही त्वरित जागा उपलब्ध करून देऊ असे स्थानिक नगरसेवक दीपक पोटे, सौ. मंजुश्री खर्डेकर, सौ. माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे यांनी स्पष्ट केले.
या भागातील नागरिक अनेक वर्षे सहन करत असलेला त्रास यामुळे दूर होईल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली व आमदार म्हणून चंद्रकांत दादा कोथरूड चे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत असतात हे आम्ही अनुभवतोय अशी भावना व्यक्त केली.