पुणे- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करताना त्यांना ताब्यात घेण्याचे मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या आदेशाचा व्हायरल व्हिडीओ आणि पुण्यातील अॅॅमिनिटी स्पेस वरील राष्ट्रवादीच्या कोलांट्या या प्रश्नांना आज च्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली .
परब हे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील एखाद्या घटनेची सूचना पोलीस आयुक्त फोन करून देत असतात. ती एक पद्धत आहे. परब यांना देखील त्याच पद्धतीने फोन करून सूचना देण्यात आली असेल, असंही अजति पवारांनी नमूद केलं.
शहरातील अमेनिटी स्पेस बाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि वादाबाबत रविवारी निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
.या प्रस्तावाबाबत बुधवारी पुणे महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्द्यांचा स्वीकार करत सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र याबाबत बुधवारी रात्री पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन या निर्णयापासून घूमजाव करण्यात आले होते. आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्याचा माझा काय मानस असतो विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण कधीच केले जात नाही.
पुणे महानगरपालिकेच्या अमेनिटी स्पेस बाबत मी रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत पक्षातील नगरसेवक. शहराध्यक्ष प्रशांत जगताप.खासदार वंदना चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे. या बैठकीच्या पूर्वी पुणे महानगर नियोजन समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याचे प्रात्यक्षिक अधिकारी वर्गाकडून दाखविणत येणार आहे.अमेनिटी बाबत निर्णय घेताना नागरिकांचे हित बघितले जाईल .
जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हा प्रसंग नसता
राणेंच्या अटक कारवाईवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केले आहे.
पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेले आणि कोर्टानं नाकारले. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या.”प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हे प्रसंग आले नसते.”, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार यांनी सांगितलं.
सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?
निधी द्यायचा झाला तर गडकरी साहेबाचं खातेही देऊ शकते. आणि यापूर्वी त्यांनी निधी देखील दिला आहे. त्यानुसार कामे पण सुरु आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? अशा शब्दात पवारांनी राणे यांच्यावर निशाणा साधला.