नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहरतर्फे आयोजन : ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कीर्तन महोत्सव
पुणे : श्री संत नामदेव महाराजांच्या ७५२ व्या जयंती निमित्त नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्यावतीने ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सोमवार दिनांक ३१ आक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान सायंकाळी ५.३० कसबा पेठ येथील आरसीएम गुजराती हायस्कूल येथे महोत्सव संपन्न होणार आहे.
महोत्सवाचे आयोजन संदीप लचके यांनी केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठी अभिनेते स्वानंद बर्वे यांच्या हस्ते होणार आहे.
सोमवार दि. ३१ आक्टोबर रोजी संजीव मेहेंदळे, कविता मेहेंदळे व सहकारी यांचा भक्ती संगीत कार्यक्रम, मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी संत तुकाराम महाराज यांचे वंशज व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे, मराठी अभिनेते अवधूत सुधीर गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ह .भ .प मुरारी महाराज नामदास (पंढरपूर) यांची ‘नाचू किर्तनाचे रंगी’ कीर्तन सेवा होणार आहे. बुधवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत आफळे यांची नारदीय कीर्तन सेवा तर गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. नेहा भोसले (साळेकर) महाराज यांची ‘गजर किर्तनाचा..’ ही कीर्तन सेवा होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी केले आहे.