प्रदेशाध्यक्ष ,शहराध्यक्ष ,नगरसेवक आणि नागरिकांची मांदियाळी …
पुणे-केंद्रातील मोदी सरकारच्या शपथविधीचा ७वा वाढदिवस आणि बावधनचे शिल्पकार म्हणून परिचित झालेल्या नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील ,भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक ,आमदार भीमराव तापकीर ,नगरसेवक अमोल बालवडकर ,किरण दगडे यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आणि १००० नागरिकांना शिधावाटप करण्याच्या कार्यक्रम आज बावधन येथे संपन्न झाला .नगरसेविका अल्पना गणेश वरपे, नगरसेविका श्रद्धा-प्रभुणे पाठक, स्वीकृत सदस्य विलास मोहोळ,वैभव मुरकुटे, व सागर कडू, कैलास मोहोळ, प्रदीप जोरी, अजित शिगवन, रूपेश भोसले, राजेश कुलकर्णी, बंडू भंडारी, शरण कोळी, सुहासिनी शिरढोणकर,पवन सतदेवे,निधि भाटीया,अपर्णा गोरे,सतीश शिंदे,अविनाश मुगळीकर,प्रियदर्शन करंजकर, ईएमएफ क्लिनिकचे डॉ.केदार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
1 ते १० जून असा सेवा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ,या कार्यक्रमाप्रसंगी ईएमएफ क्लिनिक्स यांच्या विद्यमाने नागरिकांकरीता मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले..या आरोग्य शिबिरामध्ये गुडघेदुखी,पाठदुखी,सांधेदुखी व संधीवताची लक्षणे,मानदुखी व मणक्यातील गॅप,ताप, खोकला, डोकेदुखी,घसा खवखवणे, शिंका येणे,न थांबणाऱ्या उलट्या,छाती व पोट दुखणे,अशक्तपणा व चक्कर येणे,वास न येणे, चव न येणे व त्याचबरोबर इसीजी (ECG) व इंमुनिटी बुस्टर इएमएमफ काढा मोफत देण्यात आले असून यासोबत कोरोंनाच्या भयंकर महामारीमध्ये नागरिकांसाठी सेवारूपी कार्य बजाविणाऱ्या रिक्शा चालक कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला व तसेच त्यांना नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.सदर आरोग्य तपासणी शिबीर 1 जून ते 10 जून पर्यन्त सातत्याने चालू राहणार आहे. कोरोंनाच्या महामारीत समाजातील विविध घटकांमध्ये उपासमारीची वेळ निर्माण झाली असताना मदतीचा हात म्हणून नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमाने पुणे महानगरपालिका प्रभाग क्रं.10 मधील सर्व रिक्शा व टेंम्पोचालक, केस कर्तनालयातील कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते, सफाई कर्मचारी, तृतीय पंथीय नागरिकांना अन्नधान्य किट, ईम्युनिटी बुस्टर आयुर्वेदिक काढा मोफत स्वरुपात वाटप करण्याचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा_पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रभागातील घरेलू काम करणाऱ्या महिलांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारे 1500 रु. चे अनुदानाचे लाभ घेता यावे याकरिता नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून घरेलू कामगार नोंदणी अभियानाची सुरुवात भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक व खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकिर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी चंद्र्कांतदादा पाटील म्हणाले की, एखाद्या विषयाचा बारीक अभ्यास करून विकासकामाबाबत प्रशसनालाही कायम मार्गदर्शन करण्यामध्ये सहभागी होऊन विकास करणारे अभ्यासू नगरसेवक अशी दिलीप वेडेपाटील यांची पुणे महानगरपालिकेत ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नगरसेवक तळागाळात(झोपडपट्टीत) प्रत्येक गरजू नगरीकांपर्यंत पोहचून या महामारीच्या काळात आपले कार्य बजावित असताना ठाकरे सरकार संपूर्णपणे झोपलेले दिसत आहे. अशा प्रकारे चंद्र्कांत पाटील यांनी विरोधकांचे देखील यावेळी कान टोचले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले व आभार प्रदर्शन शैलेश वेडेपाटील यांनी केले.