जि.प प्राथ़ शाळा ठाकरवाडी (तेजूर)येथे “जागतिक आदिवासी दिन” साजरा.
जुन्नर /आनंद कांबळे
संयुक्त राष्ट्र संघाने १९९४ साली ‘९आँगस्ट’ हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला तेव्हापासून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. या दिवसाचे औचित्य साधून शाळेत सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली
विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेषभूषा केली होती.त्यामधून आदिवासी संस्कृती व परंपराची माहिती मुलांना झाली या निमित्ताने धरतीआबा बिरसा मुंडा व क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुजन तंटामुक्तीचे अध्यक्ष सनाशेठ केदार व मुख्याध्यापक आ. का मांडवे यांचे हस्ते करण्यात आले.
विद्यार्ध्यांनी आदिवासी क्रांतीकारकांची माहिती दिली तसेच आदिवासी गीतांचे गायनही करण्यात आले.आदिवासी संस्कृती, रुढी परंपरा व चालीरिती बाबत आदि. सचिन नांगरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक मांडवे सर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजनतळपे तानाजी सर व कुडेकर लक्ष्मण(सर) यांनी केले. याप्रसंगी अंगणवाडी कार्यकर्ती सौ.तुरे कुंदा,मदतनीस सौ.विमल केदार,सौ.हिराबाई गावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.