वृद्धेला मारहाण करून मोलकरणीने पळवले १० तोळे सोने ..जुन्नर मधील प्रकार
जुन्नर /आनंद कांबळे : – जुन्नर शहरातील भर वस्ती असणाऱ्या सदाबाजार पेठ येथील एका राहत्या घरात ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेला त्यांच्या राहत्या घरात धुणीभांडी करणार्या महिलेने डोळ्यात काहीतरी टाकून, तोंडात रुमाल कोंबून, डोके भिंतीवर आपटुन जबरदस्तीने ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील एकूण १०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
नलिनी दत्तात्रय गाटे( वय ७६ राहणार सदाबाजार पेठ ,जुन्नर) या ज्येष्ठ नागरिक महिला त्यांच्या घरात एकट्या राहत असून शुक्रवार दिनांक २६ रोजी सकाळी ११ वाजायच्या दरम्यान त्यांच्या घरी धुणीभांडी चे काम करणाऱ्या शोभा शंकर शेटे (राहणार सदाबाजार पेठ, जुन्नर) ही त्यांच्या घरी कामासाठी आलेली असताना तिने गाटे यांचे डोके भिंतीवर आपटुन, तोंडामध्ये रुमाल कोंबून, छातीवर पाय ठेवून त्यांच्या अंगावरील सोन्याच्या ४ बांगड्या,२ पाटल्या,१ सोन्याचे गंठण आसा एकूण १०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लंपास केले. ज्येष्ठ महिला जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद त्यांनी जुन्नर पोलिसांकडे नोंद केली असून पोलिसांनी शेटे या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे, पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी करीत आहेत.
संजय शंकर पवार मृतावस्थेत आढळले –
– जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव म्हाळुंगे येथील ४० वर्षीय इसमाचा मृतदेह वडगाव सहानी येथील कॅनॉलमध्ये शनिवारी दुपारी आढळून आला आहे.
संजय शंकर पवार (वय 40) यांचा मृतदेह कळसुबाई मंदिर, वडगाव सहानी येथील कॅनॉल मध्ये शनिवारी दुपारी आढळून आला. कॅनॉलच्या पाण्यात बुडून ते मयत झाले. त्यांना दारूचे व्यसन होते याबाबतची खबर संदीप पवार यांनी जुन्नर पोलिसांना दिली. अकस्मात मयत म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.