घाटघर शाळेत शालेय साहित्य वाटप
जुन्नर / आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील घाटघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गम परिवार या गिरीप्रेमी परिवाराने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी इयत्तानिहाय आवश्यक वहया, इंग्रजी प्रायमर बुक , डिक्शनरी, पेन्सिल बॉक्स रेनकोट ,पाणी बाटली, खोडरबर, चित्रकला वही, जेवणाचा डबा, पेन ,रंगपेटी, स्केच पेन बॉक्स ,पाटी इत्यादी साहित्य वाटप केले.
शिवनेरी भूषण रमेश खरमाळे, वनपाल मडके, दुर्गम परिवाराचे शुभम थोरात, सौरभ ठुबे, भाग्यश्री मांझीरे ,मयूर कासरंग, मयूर औटी, सुभाष रावते (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) पालक यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले .
अभ्यासाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे प्राचीन गडकोट किल्ले ऐतिहासिक वारसा जतन करून राष्ट्रपुरुषांच्या पुस्तकांचे वाचन करण्याची श्री खरमाळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना आवाहन केले या मदतीमुळे पालकांचा आर्थिक भार हलका होत आहे व विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत आहे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब गिलबिले यांनी केले तर आभार प्रशांत लोखंडे यांनी मानले .कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब शिंदे, प्रवीण घोलप यांनी केले.