जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत
जुन्नर /आनंद कांबळे
शाळेचा पहिला दिवस .नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली,शाळेतील पहिला दिवस कायम बालचमुंच्या स्मरणात रहावा यानिमित्ताने आज शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पारंपरिक वाद्यवृंद ढोलताशाने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले.
दिवसेंदिवस बैलगाडीत बसून प्रवास करण्याचा आनंद दुर्मिळ होत आहे. त्याचा आनंद आज बैलगाडीच्या मिरवणुकीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला.
शाळेतील पहिले दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात आले.प्रभात फेरी नंतर मुलांसाठी शाळेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेतील सर्व मुलं मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवामध्ये सहभागी झाली याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाकीर पटेल उपाध्यक्ष सुशील जावळे व सर्व सदस्य उपस्थित होते.
त्याचबरोबर निमगाव सावा गावचे सरपंच सौ. सुनीता ताई घोडे ,सर्व सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवांमध्ये सहभागी झाले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावर्षी शाळेची यावर्षी शाळेची पटसंख्या वाढत असून सर्वांनी कौतुक केले .शाळा प्रवेशोत्सवसाठी सर्वांनी खूपच मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण लांडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गणेश थोरात,गणपत घोडे गुरुजी, रवी शेगर,उपशिक्षक लहू गोफने, संतोष साळुंके,सौ.शोभा गोंदके,सौ. जयश्री जावळे,सौ. प्रशाली डुकरे, सौ.आशा चुकाटे यांनी नियोजन केले .उपशिक्षक संतोष डुकरे यांनी सूत्र संचालन केले.