सेवापूर्ती गौरव सभारंभ निमित्ताने सामाजिक उपक्रम संपन्न
जुन्नर /आनंद कांबळे
पारुंडे (ता-जुन्नर) येथील श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिराचे मुख्याध्यापक फकीर आतार हे ३४ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले.
त्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील विविध सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने सेवापूर्ती गौरव सभारंभचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी मार्च २०१९ मधील एस.एस.सी. तील गुणवंत विद्यार्थाचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करताना जिल्हा परिषद जेष्ठ सदस्या आशाताई बुचके म्हणाल्या कि, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षक सेवापूर्ती निमित्त गौरव होतो, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. अजूनही पौराणिक काळानंतर ही गुरुचे स्थान आई-वडील इतके महत्वाचे आहे.
या वेळी शिवांजली साहित्य पीठाच्या माध्यमातून संकलित केलेल्या “आई-बाप” या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते, तालुक्यातील शाळांना मोफत ‘प्रथोमपचार पेटीचे’ वाटप करण्यात आले. यावेळी शुभेच्छा देताना सोनवणे म्हणाले कि संघर्षमय जीवन जगून शून्यातून अस्तित्व निर्माण करणे हे व्यक्तिमत्त्व, दातृत्वातून आरोग्य जपण्यासाठी शाळांना प्रथोमपचार पेटी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आल्या.
वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना सुसंस्कारितपणे घडविल्याचे चित्र, समोर बसलेल्या जनतेमध्ये बघावयास सरांच्या माध्यमातून मिळत आहे.
या प्रसंगी अनेक पालक , माझी विद्यार्थी यांच्यावतीने आतार यांचा सपत्नीचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री, पुष्पांजलीचे चेअरमन ज्ञानेश्वर पुंडे, मार्तंड देवस्थान चिंचोलीचे अध्यक्ष भाऊसाहेब काशीद, श्री कुलस्वामी देवस्थान वडजचे अध्यक्ष विजय चव्हाण, सरपंच विजया चव्हाण,अजित चव्हाण प्रा. भालवणकर, माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पवार, श्री ब्रम्हनाथ सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश पुंडे, रुपाली बोकरीया,प्रशांत केदारी, वसंतराव पवार, लेण्याद्री देवस्थानचे माजी अध्यक्ष जयवंत डोके, विठ्ठलवाडीचे सरपंच आदिनाथ चव्हाण ,सुफी संत लतीफ भाई, रामभाऊ सातपुते आदि मान्यवर प्रसंगी उपस्थित होते.
हा गौरव सभारंभ डिसेंट फाउंडेशन , पुणे. राजाराम पाटील वृद्धाश्रम, बल्लाळवाडी
मतिमंद मुलांची संस्था ( नंदनवन ) धामणखेल , जुन्नर तालुका शिक्षक-पालक संघ (रजि.), शिवांजली साहित्य पीठ – चाळकवाडी. समर्थ रुरल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनस – बेल्हे, गुरुवर्य वै. कोंडाजी बाबा डेरे वारकरी संस्था पर्णकुटी वैष्णवधाम, मार्तंड देवस्थान ट्रस्ट, चिंचोली आदि संस्थांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक जितेंद्र बिडवई यांनी केले. सूत्रसंचालन मेघनाथ जाधव तर आभार संदीप पानसरे यांनी व्यक्त केले.