श्री शिव छत्रपती महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा
जुन्नर/आनंद कांबळे
जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यानी १२ वी बोर्ड परीक्षेत उज्वल यश मिळविले.
महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेचा निकाल ९५.९८%लागला.शास्त्र शाखेत सौरभ विजय जेजुरकर याने ८९.०८%गुण मिळवून व संस्कृत विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.कुमारी दीक्षा किशोर वाघचौरे हिने ८५.८५% गुण मिळवून द्वितीय तर धीरज धनंजय कुलकर्णी याने ८५.३८% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केले. शास्त्र शाखेतून १६ विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी संपादन करून उज्वल यश मिळविले.तर ११५ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी संपादन करून उज्वल यश मिळविले.
वाणिज्य शाखेचा निकाल ९७.७५% असून वाणिज्य शाखेतून कुमारी प्रतीक्षा गोरक्ष शिंदे हिने ९२.३० % गुण मिळवून जुन्नर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला तसेच वाणिज्य विभागात कुमारी तलांडे प्रियंका हिने अकौंट विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक मिळवला.
कला शाखेचा निकाल ७९.५८% लागला.कुमारी मानसी कृष्णा गवळी हिने ९१.८४% गुण मिळवून कला शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.एम.सी.व्ही.सी.विभागाचा निकाल ९०.९६% एवढा लागला. उज्वल यश संपादन करणा-या सर्व विद्यार्थ्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या सर्व प्राध्यापकांचे संस्थेचे.अध्यक्ष मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे संस्था पदाधिकारी अध्यक्ष प्रतिनिधी.प्रा.व्ही.बी.कुलकर् णी मा.प्रभारी प्राचार्य डॉ.सी.आर.मंडलिक व उपप्राचार्य यांनी अभिनंदन केले