मासे आणण्यासाठी गेलेले तीन तरूण माणिकडोह धरणात बुडाले -होडी उलटून दुर्घटना
एन.डी. आर. एफ पथकाकडून शोध
जुन्नर /आनंद कांबळे
केवाडी येथेधरणातून मासे आणण्यासाठी गेलेले तीन तरूण माणिकडोह धरणात बुडाल्याची घटना घडली आहे, सकाळी साडेसातच्या सुमारास होडी उलटून ही दुर्घटना घडली.स्थानिक तरूण आणि पोलीसांकडून शोघकार्य करण्यात आले परंतू त्याला यश न मिळाल्याने एन.डी.आर.एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले .
दोन बोटी आणि आठ जवानांनी बेपत्ता तरूणांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह दुपारनंतर शोधून काढले.अधिक माहीतीनुसार पाच परप्रांतीय मच्छीमार त्यांची होडी घेऊन मासेमारीसाठी निघाले होते. त्यावेळी केवाडीच्या आसपासच्या गावात राहणारे तीन तरूण तेथे आले .त्यांनी मासे आणण्यासाठी होडीत बसण्याची विनंती त्यांना करत ते होडीत बसले. मात्र ही होडी काही अंतरावर गेल्यानंतर उलटली. त्यात गणेश भाऊ साबळे(वय२२),स्वप्नील बाळू साबळे(वय २२) आणि पंढरीनाथ मारुती मुंढे ( वय २५)हे पाण्यात पडून बुडाले. इतरांनी पोहून किनारा गाठल्याने ते वाचले.