माणिकडोह धरण पाणी सोडल्याप्रकरणी आमदार शरद सोनवने यांचे ठिय्या आंदोलन
जुन्नर-मणिकडोह धरणातुन पाणी सोडण्यात येणार असल्याने आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात रात्री 12 पासुन 4 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील मेहेर,जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, नगराध्यक्ष शाम पांडे, जुन्नर शहरप्रमुख शिवा खत्री, अविनाश करडीले पाडळी चे सरपंच संतोष केदारी ,संतोष घोटणे, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातुन पाणी बाहेर जाऊन देणार नाही असा इशारा सोनवणे यांनी दिला.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मध्यरात्री चर्चा केली.पाणी येडगाव धरणात सोडण्यात येत असून सोडलेले पाणी तालुक्यात रहाणार आहे .
येडगाव धरणाची (लेव्हल)राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे .यासंदर्भात सर्व आंदोलकांच्या आपण पाठीशी आहोत.असे आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी सांगितले.