पुणे-कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. अन्न,वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी रोजगार ही देखील मूलभूत गरज बनली आहे.कोरोनामुळे नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले असून बेरोजगार असलेल्या तरुण युवक व युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी पुणे शहर काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्यावतीने संपूर्ण पुणे शहरात ऑनलाईन रोजगार मेळाव्याद्वारे पुणेकरांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित आयोजित केले असून पुढील 3 महिने हा रोजगार मेळावा राबवण्यात येणार आहे.पुणेकरांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन कोरोना बरोबरच बेरोजगारीवरही मात करावी असे आबा बागुल म्हणाले.
आबा बागुल म्हणाले की, सामाजिक कार्य करत असताना अनेक नागरिक नोकरीसाठी जनसंपर्क कार्यालयात येतात. कोरोनामुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बेरोजगार नागरिकांना रोजगार देण्यासाठी माझ्या संकल्पनेतून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून अ व्हेंचर ऑफ जॉब शोकेस इंडिया प्रा.ली. या कंपनीशी करार केला असून 500 हुन अधिक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी या कंपनीच्या माध्यमातून मा. श्री. आबा बागुल यांचे जनसंपर्क कार्यालय शिवदर्शन ,पुणे येथून विविध ठिकाणांमधील Manufacturing, IT, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Facility, Hospitality, Real Estate, Automobile, Agriculture, Pesticide & Fertilizer, Media आदी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तरुण- तरूणींची ऑनलाईन मुलाखत घेणार आहेत. यामध्ये कमीत- कमी ५ वी पास ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले तरुण – तरूणी सहभागी होऊ शकतात.
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे संयोजन काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागूल करणार आहेत.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नाव नोंदणी करणे गरजेचे असणार आहे.
लिंक- https://bit.ly/3iF7nJR
ऑनलाईन नाव नोंदणी दि. 15 ऑगस्ट 2020 पासून सुरू असून पुढील तीन महिने सुरू राहणार असून रोजगार मिळवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे असणार आहे.
1. ऑनलाईन नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे, नोंदणी लिंक – https://bit.ly/3iF7nJR
- मुलाखतीचे दिनांक, वेळ, ठिकाण आपणांस SMS/ Call द्वारे कळविले जाईल. ( कृपया दिलेल्या दिवशी व वेळेतच मुलाखतीसाठी येणे अनिवार्य आहे. )
- मुलाखत घेणाऱ्या कंपनी विषयी, पेमेंट, कामाचे ठिकाण, इतर सुविधांविषयी अधिक माहिती मूलाखतीच्या अगोदर कळवली जाईल.
4. मुलाखतीसाठी येताना फाॅरमल ड्रेस घालून येणे. - आपले Selection/Shortlist/Rejection सर्वस्वी आपल्या मुलाखतीवर अवलंबुन असणार आहे.
- आपले Selection/Shortlist/Rejection चे सर्व अधिकार मुलाखत घेणाऱ्या कंपनीचे असतील.
- मुलाखत झाल्यानंतर ज्या लोकांचे Selection झाले आहे, त्यांना Call द्वारे कळवले ज़ाईल.
- ज्यांचे Selection होईल, अशा लोकांनी सांगितलेल्या दिवशी कामावर हजर राहणे गरजेचे आहे.
बेरोजगार युवक युवतींनी या सुवर्णसंधीचे सोने करून चांगला रोजगार मिळवावा असे आबा बागुल म्हणाले.