अभियांत्रिकीतील नोकरी-व्यवसायाच्या संधींवर’ मराठी विज्ञान परिषदेतर्फे मंगळवारी व्याख्यान
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे स्थानिक केंद्र यांच्या संयुक्त विदयमाने ‘अभियांत्रिकीतील नोकरी-व्यवसायाच्या संधी’ व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्राचे आयोजन केले आहे. येत्या मंगळवारी (दि. १८) सायंकाळी ६.१५ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील दि इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या फिरोदिया सभागृहात होणार आहे. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आणि पर्यावरण अभियंता राजेंद्रकुमार सराफ यांचे ‘टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती’ यावर व्याख्यान होईल.
शिळ्या भाताचा फोडणीचा भात हे मूल्यवर्धित वस्तू तयार करण्याचे घरातले सर्वोत्तम उदाहरण आहे. अंड्याच्या छिलक्यापासुन प्रसाधने व औषधे तयार करता येतात. विज्ञान अभियांत्रिकी वापरून मूल्यवार्धित वस्तू निर्मितीचे अनेक व्यवसाय करता येतात. टाकाऊ पदार्थ हाच कच्चा माल तयार मालाचा भाग असतो. सात वेगवेगळ्या प्रकाराने मुल्यवर्थित वस्तूची निर्मिती करता येते. याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्याख्यानासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. विदयार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.