पुणे : पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे सोमवारी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. मंडळाच्या कार्यालयात पत्रकार बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर जोशी यांच्या हस्ते पत्रकारांना खुर्शीद बाटलीवाला आणि दिनेश घोडके लिखित ‘रेडी स्टडी गो ‘ पुस्तक, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी मोरेश्वर जोशी यांचा सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा गौरव केला. याप्रसंगी गोपाळ जोशी, आनंद गिल्डा, राजेंद्र पंढरपुरे, व्यंकटेश भोळा, जीवराज चोले, ज्ञानेश्वर फड, शरणू जवळगी, रवि यादव, निलेश चौधरी, संहिता यरगट्टीकर, उदय लेले आदी उपस्थित होते. पत्रकारिता अभ्यासक्रमात अद्ययावत संगणक तंत्रज्ञान, बातमी टाईप करण्याचा वेग वाढविण्याविषयी प्रशिक्षण आदी सूचना पत्रकारांनी डॉ. आबनावे यांना केल्या. मंडळाच्या वृत्तविद्या अभ्यासक्रमाची माहिती देऊन डॉ. आबनावे यांनी पत्रकारांच्या सूचना अंमलात आणण्याचे आश्वासन दिले.