आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत होरांगी अकॅडमीच्या खेळाडूंचे यश
पुणे : वडगावशेरी येथील होरांगी तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी कोलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘पुमसे’ या क्रीडा प्रकारात यश मिळवले. कोलकाता येथील जिओंग तायक्वांदो अकॅडमी आणि कोरिया तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अकॅडमीच्या मास्टर कपिल अनमल, समिक्षा यमजाल व अविरल त्रिपाठी यांनी सुवर्णपदक पटकावले. सरवेश केदगोणी, शौर्या मुजूमदार, क्रिश केदगोणी, सुमेधा साखरे यांनी रौप्यपदक, तर सान्वी क्षेत्री, मंथन देवी, सिद्धू क्षेत्री यांनी कांस्यपदक पटकावले. सलग चौथ्या वर्षी अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत भारतासह चीन, जपान, मलेशिया, बांगलादेश, नेपाळ, कोरिया, भूतान, इंडोनेशिया आदी देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताकडून महाराष्ट्र, राजस्थान, टिएफआय, पंजाब, आसाम, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत व परदेशातून एकूण ८६० पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. होरांगी तायकवांदो अकॅडमीचे अध्यक्ष मास्टर बाळकृष्ण भंडारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. या खेळाडूंना प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय खेळाडू सलग ५ वर्ष साऊथ कोरीयात प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच मास्टर कपिल अनमल व सिद्धू क्षेत्री आणि रविंद्र भंडारी यांनी दिले.