पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक येत्या रविवारी (दि. २२ डिसेंबर) सकाळी ११ वाजल्यापासून अल्पबचत भवन येथे होत आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली.
‘रिपाइं’च्या (आठवले) राज्य कार्यकारिणीच्या या महत्वपूर्ण बैठकीला राज्यातील ‘रिपाइं’चे सर्व जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, विभागीय अध्यक्ष, सरचिटणीस, विविध आघाड्यांचे प्रमुख, राज्य कार्यकारिणी सदस्य, केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी यासह अन्य महत्वपूर्ण विषयांवर रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.