पीकविम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी डॉ. मिलिंद संपगावकर यांचा पुढाकार
पुणे : सध्या महाराष्ट्रात असलेली ओला दुष्काळ सदृश पूरपरिस्थिती व अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे विविध संघटना, राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे मिळावेत, यासाठी आंदोलन करीत आहेत. ‘सिद्धी असोसिएट्स’नेही यात पुढाकार घेत शेतकरी बांधवांसाठी पिकविम्याच्या नुकसान भरपाई संबंधित सर्व अडचणींना, योग्य ते मार्गदर्शन करून विम्याच्या दाव्याची रक्कम संबंधित खात्यात जमा करण्यासाठी सिद्धी असोसिएट्सच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे विमा क्षेत्रात डॉक्टरेट मिळवलेले विमाप्रतिनिधी आणि ‘सिद्धी असोसिएट्सचे संचालक डॉ. मिलिंद संपगावकर यांनी दिली.
डॉ. मिलिंद संपगावकर आणि त्यांची टीम सिद्धी आसोसिएट्सने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. डॉ. संपगावकर मागील वीस वर्षापासून अनेक विमा कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करत असून, विमा क्षेत्रात पीएचडी केलेले भारतातील ते एकमेव विमाप्रतिनिधी आहेत. विमा कंपनीबरोबर असलेले जुने व घनिष्ट संबंधाच्या आधारावर हा उपक्रम यशस्वी करणे सहज शक्य होईल. शेतकरी बांधवांसाठी पिकविम्याच्या नुकसान भरपाईसंदर्भात क्लेमशी संबंधित सर्व अडचणींना, योग्य ते मार्गदर्शन करून विम्याच्या दाव्याची रक्कम संबंधित खात्यात जमा करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. पिक विम्याच्या दावा अथवा क्लेम संदर्भात काही अडचण असल्यास कृपया क्लेम संदर्भातील (दावा संदर्भातील) संपूर्ण कागदपत्रांच्या झेरॉक्स कार्यालयात पाठवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन डॉ. मिलिंद संपगावकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मिलिंद संपगावकर म्हणाले, “काही गावांमध्ये कुरिअर, इमेल अथवा पोस्टाने हे कागदपत्रे पाठवणे शक्य नाही. तसेच रब्बी हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने त्वरित क्लेम सेटल व्हावे व त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी कागदपत्रे निशुल्क पाठ्वण्याची व्यवस्था एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शेतकरी बांधवानी आपली कागदपत्रे डॉ. मिलिंद संपगावकर, कार्यकारी संचालक सिद्धी असोसिएट्स, चौथा मजला, पुणे स्टॉक एक्सचेंज ७५२ सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे – ४११०३० या पत्त्यावर किंवा स्कॅन केलेली कागदपत्रे milind.sampgaonkar@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी ९९२१२१४२९९, ९०६७०४७७४९, ९०४९४६४०८७ किंवा ७७९६८७५८४४ यावर संपर्क साधावा.”