विज्ञान परिषदेतर्फे ‘लैंगिक उत्क्रांती’वर चर्चा
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आयोजित ‘लैंगिक उत्क्रांती’वर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. डॉ. शंतनु अभ्यंकर व डॉ. मिलिंद वाटवे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या शुक्रवारी (दि. १८ ऑक्टोबर २०१९) रोजी सायंकाळी ६.१५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहामध्ये हे चर्चासत्र होणार आहे.
मनुष्यप्राण्यात उत्क्रांती होताना लैंगिकतेची आणि लैंगिक जाणिवेची उत्क्रांती होत आजपर्यंत वाटचाल कशी झाली? याविषयी या चर्चासत्रात भर दिला जाणार आहे. तरी अधिकाधिक पुणेकर विज्ञान प्रेमींनी हा विषय समजून घेण्यासाठी चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्रकुमार सराफ यांनी केले आहे.