कुटुंब आणि महाविद्यालयातील प्रत्येकाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश संपादित करू शकले. यापुढे मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धा जिंकायच्या आहेत. त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेत असून, आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने हे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा विश्वास तनिषाने व्यक्त केला. तिचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी उपस्थितांनी तिला शुभेच्छा दिल्या.
मिस इंडिया, मिस युनिव्हर्स होण्याचे स्वप्न ;तनिषा पाल हिची भावना
पुणे : मिस इंडिया ऑर्गनायझेशन आयोजित एफबीबी कॅम्पस प्रिन्सेस स्पर्धेत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या तनिषा पाल या विद्यार्थिनीला ‘मिस पुणे २०१९’ चा किताब मिळाला. नुकत्याच या स्पर्धा पुण्यात पार पडल्या. तनिषा पाल ही सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन, रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये (एससीएमआयआरटी) बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ‘मिस इंडिया’, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेसाठी तनिषाला सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अँड वेलनेसकडून २०२२ पर्यंत सर्वतोपरी मदत करणार असून, तिला मार्गदर्शन, प्रोत्साहन देणार असल्याचे संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी सांगितले.
तनिषाने मिळवलेल्या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तनिषाचे वडील नरेंद्र पाल, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, सांगवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डी पाटील, राजगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख, ‘सूर्यदत्ता’चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेश कासंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुर्यदत्ता शिक्षण संस्था वचनबद्ध आहे. त्यांच्यातील क्षमतांना वाव देण्यासाठी आणि व्यक्तिमत्व घडण्यासाठी अवांतर कार्यक्रमांत त्यांना भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते. तनिषाने मिळवले यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्य यामुळे तिच्या डोक्यावरील मुकुट अधिकच शोभून दिसत आहे. तिला मिस इंडिया आणि मिस वर्ल्डसाठी खूप शुभेच्छा देतो.”