‘मोबाईल वापराचे परिणाम’मिलिंद बेंबळकर यांचे व्याख्यान
पुणे : मराठी विज्ञान परिषद व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद बेंबळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘मोबाईल वापराचे परिणाम : मिथक आणि सत्य’ या विषयावर मंगळवार, दि. २१ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. सर्व विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी हे व्याख्यान विनामूल्य खुले असणार आहे.
गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानग्यांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळेच मोबाईलच्या स्क्रीनवर आहेत. याचे अनेक चांगले आणि वाईट परिणाम आहेत. एकीकडे या तंत्रज्ञानाने जग जवळ आले, तर माणसांची मने मात्र दुरावली आहेत. नेमके हे परिणाम काय आहेत? त्याचा वापर कमी होईल का? मोबाईलचे व्यसन किती योग्य? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिलिंद बेंबळकर आपल्या व्याख्यानातून उलगडणार आहेत. तरी अधिकाधिक पुणेकरांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे संयोजकांनी कळविले आहे.