पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाची सूत्रे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे सोपविण्यात आली. पक्षाच्या संघटनपर्व कार्यक्रमात मुळीक यांची निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यमान शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, यावेळी झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार, भीमराव तापकीर, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, यांच्यासह माजी आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित आहेत.
शहराध्यक्षपदी मुळीक यांची निवड करावी, असा प्रस्ताव मिसाळ आणि त्याला पक्षाचया आजी-आमदारांनी अनमोदन दिले
मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हेमंत रासने यांना महापालिकेतील महत्त्वाची पदे दिली आणि पाठोपाठ शहर अध्यक्षपदी मुळीक या तरुण नेत्याला संधी दिली आहे.
कोण आहेत जगदीश मुळीक, घ्या जाणून :
- वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार (२०१४ ते २०१९ )
- २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांच्याकडून पराभूत
- शांत, संयमी, सुसंस्कृत म्हणून पक्षात ओळख
- भाऊ योगेश मुळीक पुणे महापालिकेत नगरसेवक
जगदीश मुळीक यांच्या निवडीचे पक्षाला होणारे फायदे :
- तरुण असल्याने नवमतदार आणि तरुणांशी थेट कनेक्ट होता येणार
- पक्षाच्या अंतर्गत गटबाजीत नसल्याने काम करणे सोपे होणार
- विधानसभेच्या कामकाजाची माहिती
जगदीश मुळीक यांच्यासमोरची आव्हाने :
- पक्षाची अंतर्गत गटबाजी मोडून संघटना अधिक मजबूत करणे
- आक्रमतेचा अभाव
- वडगाव शेरी वगळता बाकी शहर कार्यकर्त्यांशी संपर्काचा अभाव
- आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनेची तयारी करणे