पुणे, 24 मे 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात ईश्वरी कारेकर, स्वरा जावळे, शिबानी गुप्ते ये खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात ईश्वरी कारेकर हिने सहाव्या मानांकित काव्या तुपेचा 6-4, 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित स्वरा जावळेने नम्रता झंवरचा 1-6, 6-1, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. शिबानी गुप्तेने सारा फेंगसेला 6-1, 6-1 असे सहज पराभूत केले.
मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अतीतटीच्या सामन्यात सर्वज्ञ सरोदेने नीरज जोर्वेकरचा टायब्रेकमध्ये 4-6, 6-2, 7-6(2) असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित वरद उंद्रेने सुजय देशमुखचा 6-0, 6-3 असा तर, सहाव्या मानांकित आर्यन कीर्तनेने क्वालिफायर युगंधर शास्त्रीचा 6-2, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:स्मित उंद्रे[1]वि.वि.कियान पटेल 6-1, 6-1; सय्यम पाटील वि.वि.अवी मिश्रा 6-0, 6-4; वीरेन चौधरी[4] वि.वि.पृथ्वीराज दुधाने 6-0, 6-1;सर्वज्ञ सरोदे वि.वि.नीरज जोर्वेकर 4-6, 6-2, 7-6(2); तनिष्क देवरे वि.वि.अझलन शेख 6-3, 6-3; अंशुल पुजारी वि.वि.रतन कुबसाद 7-6(1), 6-1; वरद उंद्रे[2]वि.वि.सुजय देशमुख 6-0, 6-3;आर्यन कीर्तने[6] वि.वि.युगंधर शास्त्री 6-2, 6-1; मुली: स्वरा जावळे[1]वि.वि.नम्रता झंवर 1-6, 6-1, 6-2; ईश्वरी कारेकर वि.वि.काव्या तुपे[6] 6-4, 6-2; सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.आर्या पाठक 6-0, 6-2; शिबानी गुप्ते वि.वि.सारा फेंगसे 6-1, 6-1; ऐश्वर्या स्वामिनाथन[7]वि.वि.रितू ग्यान 6-2, 6-0; रित्सा कोंडकर[3] वि.वि.अहाना पाटील 6-1, 6-2; काव्या पांडे[5]वि.वि.श्रावी देवरे 2-6, 6-4, 7-5;रितिका डावलकर[2]वि.वि.ओजसी देगमवर 6-0, 6-0;
दुहेरी: मुले: दुसरी फेरी: आदिनाथ कचरे/शौर्या गडदे वि.वि.मिहीर काळे/प्रत्युश काळे 6-2, 6-1;पृथ्वीराज दुधाने/नील देसाई वि.वि.तनिश पाटील/अझलन शेख 5-7, 7-6(4), 10-4;अंशुल पुजारी/सर्वज्ञ सरोदे वि.वि.त्रिशिक वाकलकर/सुजय देशमुख[4] 6-1, 7-5;प्रजीत मदिरेड्डी/आश्रित माज्जी वि.वि.सय्यम पाटील/राघव अगरवाल 7-5, 3-6, 10-6;रतन कुबसाद/अर्चन पाठक वि.वि.रुद्र मेमाने/अथर्व बगाडे 6-3, 6-4;
मुली: शिबानी गुप्ते/मायरा टोपणो वि.वि.आदिती खानापुरी/ईश्वरी कारेकर 6-4, 5-7, 10-1.