पुणे :
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट ( आयएमईडी ) यांच्यातर्फे बँकिंग आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर असलेल्या प्रा शाम भुरके यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ही घेतली. आय एम ई डी च्या सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी आय एमई डी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी प्रा शाम भुरके आणि सुधीर गाडगीळ यांचा सत्कार केला. प्रा शाम भुरके यांनी जीवनातील आनंद आणि विनोदाचे महत्व खुसखुशीत किश्शाद्वारे उलगडून दाखवले .भीमसेन जोशी, प्र के अत्रे अशा विविध क्षेत्रांच्या दिग्गजां मुळे वाचन, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची गोडी लागत गेल्याचे सांगितले. आयुष्यातील वेळेचे नियोजन कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कसे उपयुक्त ठरते याबद्दल ही त्यांनी मार्गदर्शन केले. सुधीर गाडगीळ यांनी नेहमीच्या खेळकर शैलीत या मुलाखतीमध्ये रंग भरले आणि प्रा. श्याम भुरके यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. त्या वेळी डॉ. रामचंद्र महाडिक यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.