पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी मंत्री उदय सामंत यांची गाडी जमावाच्या कचाट्यात सापडली आणि या गाडीवर जोरदार मारा करत घोषणाबाजी करण्यात आली आहे. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले असता कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दगडफेकीत त्यांच्या गाडीची काच फुटली.आज शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा ही पुण्यातील कात्रज भागात सुरू होती. त्याचवेळी ही घटना घडली आहे. यावेळी सामंत हे येथूनच जात असल्याने सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पलफेकझाली आणि गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांची त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला फेकले. आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी मोठी गर्दी या वेळी होती. त्याच वेळी मुख्यमत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पुण्यात होते. सामंत हे आज दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकत असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच जमावाच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली.आणि हि घटना घडली .