पुणे- गद्दार..गद्दारच्या घोषणा देत आ. उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी कात्रजच्या चौकात आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करणारे, व व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे , मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक केल्याचे वृत्त आहे. . याप्रकरणी सुमारे पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकात सभा होती. त्याचवेळी मुख्यमंत्री इथन जवळच असलेल्या बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी आले होते.त्यांच्याबरोबर उदय सामंत तसेच अनेक नेते होते.सावंत यांच्या घरातून मुख्यमंत्री शिंदे हे स्वारगेट जवळील शंकर महाराज मठात जाणार होते.त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी आपला मुंबईला जाण्याचा बेत बदलून शंकर महाराज मठात जाण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे पोलिसांनी कात्रजकडून स्वारगेटकडे जाणारा रस्ता मोकळा केला होता.त्याचवेळी उदय सामंत हे मुंबई बाय पासला जाण्यासाठी कात्रज चौकात आले. त्यावेळी नुकतीच सभा संपलेली होती.एका बाजूला मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांना वाट करुन देण्यासाठी पोलीस रस्ता मोकळा करीत असताना उदय सामंत यांची विरुद्ध दिशेने आलेली गाडी नेमकी जमावाच्या कचाट्यात सापडली.
गाडीत उदय सामंत आहेत हे पाहिल्यावर जमावातील गाडीवर बाटल्या, चपला, दगडांचा मारा केला.त्यात गाडीची मागची काच फुटली त्याचवेळी तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांच्या गाडीला मोकळी वाट करुन दिली.तेथून ते कोथरुड पोलीस ठाण्यात आले तेथे त्यांनी तक्रार दाखल केली आहे.