पुणे- कोरोना सारख्या महामारी च्या काळात रुग्ण सेवेत अपयशी ठरत असलेल्या भाजपच्या सत्तेत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी जम्बो रुग्णालयाला पैसे देण्यास वाजविलेली नकार घंटा संतापजनक असून काम करता येत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली करावी, लोकांच्या जीवाशी खेळण्या चा त्यांना अधिकार कोणी दिलेला नाही असही सणसणीत चपराक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितिन कदम यांनी लगावली आहे.
यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्या मुळे बेड्स कमी पडत असलेल्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र शासन 50 टक्केबरोबर पुणे महानगरपालिकेने 25 टक्के निधी देण्याबाबत निर्णय झालेला आहे. हा 25% चा पुणे मनपाचा वाटा देण्यास स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने यांनी नकार दिलेला आहे.पुण्यात रोज एक हजार ते दीड हजार कोरोणा बाधित रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंतची संख्या ही पंचवीस हजाराच्या वर गेली आहेत. जवळजवळ दोन हजार पुणेकर मयत झाले आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना स्थायी समिती अध्यक्ष यांचे भूमिका अत्यंत चुकीची व संतापजनक आहे. लाखो पुणेकरांनी आपले कर्तव्य बजावत बाराशे ते पंधराशे कोटीचा मिळकत कर भरलेला आहे. त्यांचेच पैसे देण्यासाठी नकार देण्याचा स्थायी समिती अध्यक्षांना काय अधिकार आहे..! ते काय पुण्याचे सावकार आहेत का..? त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (पर्वती) तीव्र निषेध करत आहे व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे.