पुणे- महापौरांच्या अँँटीचेंबर मध्ये आज महापालिकेचा अर्थ संकल्प सादर झाल्यानंतर विपक्षनेत्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिपाली प्रदीप धुमाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आणि प्रशांत जगताप, विशाल तांबे,प्रकाश कदम,दत्ता धनकवडे ,सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे ,वैशाली बनकर, योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव अशी आमची मोठी फौज आहे.सोबतीला कॉंग्रेसची तोफ आहे … हिम्मत असेल तर आता तरी बजेट वरील चर्चेसाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे दरवाजे उघडा असे जाहीर आव्हान त्यांनी महापौर आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. शांत आणि सुस्वभावी म्हणून परिचित असलेल्या दिपाली धुमाळ यांनी अशा पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर असंख्य नगरसेवकांच्या भावनांचा बांध फुटणार आहे, ज्याचा सामना महापौर आणि पदाधिकाऱ्यांना करावा लागणार आहे. कोरोना मुळे राज्य शासनाच्या आदेशाच्या नावाखाली भाजपानेअँँटीचेंबर मधून रडीचा डाव खेळत पुणेकरांची दिशाभूल आणि फसवणुकीचा कारभार सुरु केला आहे.वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातून राज्य शासनाचे आदेश पाळतच ऑनलाईन सभा घेता येत होत्या. आणि काही घेतल्या सुद्धा .. पण इथे पारदर्शक कारभारामुळे काही डाळ शिजणे अवघड वाटल्याने त्यांनी मुख्य सभाच अँँटीचेंबर मध्ये हलविली. हा घात ऐतिहासिक असा नोंदला जाईल. अजूनही शासनाच्या आदेशाप्रमाणे च कोरोनाचे सर्व नियम अटी यांचे पालन करत छत्रपतींच्या नावाच्या सभागृहाचे दरवाजे भाजपने उघडावेत . हे सभागृह कमी पडतच नाही आणि पडले तर ऑनलाईन असल्याने जुन्या सभागृहात काही सभासद बसून सहभागी होऊ शकतात असे दिपाली धुमाळ म्हणाल्या .राज्याचे अधिवेशन आमच्या महाविकास आघाडीने खंबीरपणे आहे त्याच सभागृहात घेऊन दाखविले हि हिम्मत पुण्याच्या भाजपात नाही असेही त्या म्हणाल्या .