पुणे – पुणे महापालिकेने गुंठेवारीचे प्रस्ताव त्वरित स्वीकारून नियमितीकरण करावे आशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी लेखी पत्राद्वारे आयुक्त विक्रम कुमार यांच्या कडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 6 जानेवारी 2021 रोजी 31 डिसेंबर 2020 पर्यंत ची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला, त्यानंतर मार्च महिन्यात अधिवेशनात यासंबंधीचा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर 21 एप्रिल ला स्थायी समिती ने देखील याबाबत चा निर्णय जाहीर केला. मात्र अद्याप पर्यंत प्रशासनाने अद्याप पर्यँत गुंठेवारी नियमितिकरणाची प्रक्रिया सुरु केली नसून त्यामुळे ह्या निर्णयाचा लाभ अद्याप पर्यंत सर्वसामान्यांना मिळालेला नाही.
तरी प्रशासनाने त्वरित सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी व गुंठेवारी चे प्रस्ताव स्वीकारून नियमितिकारण करावे. कोरोनाच्या संकटकाळात पुणे मनपास याद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल आणि अनेक वर्षे अडकलेल्या सामान्य नागरिकांना दिलासा ही मिळेल. शब्दश: हजारो सामान्य सदनिकाधारकांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नियमितिकरण न झाल्यामुळे ते हवालदिल झालेत. एकीकडे कर्ज काढून घेतलेल्या घराचे हप्ते सुरु असून काहींना ताबा मिळालेला नाही तर काहींचे मंजूर गृहकर्जाचे वितरण होत नसल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.