कोरोनावर मात करून शिवसेनेचे भानगिरे पुन्हा जनसेवेत रुजू –
हवे तर आम्हाला देव मानू नका ,पण किमान लुटारू ,राक्षस म्हणून तरी हिणवू नका – डॉ. राज कोद्रे
पुणे- आपल्या प्रभागात आणि एकूणच पूर्व पुण्यात कोरोना महामारी मुळे जनतेच्या सेवेस वाहून घेताना जनतेत मिसळत मदतीचे कार्यक्रम घेत राहिलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांना कोरोनाची लागण झाली, १० दिवस हडपसरच्या नोबेल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत कोरोनावर मात केल्यानंतर आज सोमवारी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी या रुग्णालयातील प्रत्येक नर्स ,आय , मावशी ,वार्ड बॉय आणि डॉक्टर्स यांचे आभार मानीत त्यांना निरोप दिला . यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाच्या ,उपचाराच्या आणि एकूणच देखभालीसाठी काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक करीत प्रत्येकाला मिठाई आणि स ॅनीटायझर चे वाटप करून कृतज्ञता व्यक्त केली . आणि पुन्हा आपण आता जनसेवेस सज्ज होत असून काही दिवसातच आपल्या हॉटेल मध्ये १०० बेड्स चे कोविड रुग्णालय सुरु करीत असल्याची घोषणा यावेळी केली .शहरात करोनाग्रस्तांचा आकडा मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रभागातील रूग्णांना उपचासाठी बेड मिळत नसल्याने शिवसेना नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी आपले कोंढवा येथील 40 खोल्यांचे हॉटेल करोना रूग्णांवर उपचारासाठी देण्यात येणार आहे. त्यात, सुमारे 100 बेडची सुविधा केली असून त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर तसेच इतर वैद्यकीय स्टाफही ते स्वत: उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठीचे पत्र भानगिरे यांनी प्रशासनास दिले आहे. कोरोनावर यशस्वी मात करून भानगिरे पुन्हा लोकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले असून आता त्यांनी आपले हॉटेलच रूग्णांसाठी देत आणखी एक आदर्श घालून दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने या केंद्राचे लोकार्पण करण्यात असल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले.
हवे तर देव मानू नका पण कृपया लुटारू ,राक्षस म्हणून हिणवू नका – डॉ . राज कोद्रे यावेळी हॉस्पिटलचे डॉ राज कोद्रे यांनी खाजगी हॉस्पिटल बाबत समाजात पसरत असलेल्या गैर समजा बाबत मोठी चिंता आणि दुखः व्यक्त केले . ते म्हणाले ,’ आमच्या कडे ९० टक्के महिलाच या विभागात देखील नर्स म्हणून काम करतात त्यातील ६० ते ७० टक्के महिला या केरला च्या आहेत . आय ,मावशी , वार्ड बॉय मिळेनासे झालेत त्यामुळे आहेत ते दोन दोन शिफ्ट काम करतात ,बरे येथे आल्यावर आणि एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर पाणी पिता येत नाही, जेवण करता येत नाही आणि वा ॅश रुम्लाही जाता येत नाही अशा अवस्थेत येथे सेवा करावी लागते .येथील मेहनत लक्षात घ्या आणि दुसरीकडे समजत कोविड विभागात काम करणाऱ्या सेवक सेविकांना घरे भाड्याची असतील तर ती खाली करण्यासाठी सक्ती केली जाते. आम्हाला हवे तर देव मानू नका पण लुटारू आणि राक्षस म्हणून तरी किमान हिणवू नका … आम्ही जी बिलासाठी दर आकारणी करतो ती सर्व शासकीय यंत्रणांनी घालून दिलेलीच करतो . पण कोरोना म्हटले कि बहुधा घरातल्या सर्वांची तपासणी करावी लागते आणि अवाढव्य खर्च असा ओरडा करीत समाज आम्हाला हिणवू लागतो . आमच्या जागेवर काम केले किंवा करतात त्यांना ठाऊक आहे . आम्ही हि माणसेच आहोत ,आम्हालाही भावना आहेत , जेवढे जीव वाचतील तेवढा आनंद डॉक्टरला प्रथम होतो .असे ते म्हणाले. (पहा हा व्हिडीओ रिपोर्ट थेट नोबेल हॉस्पिटल मधून …..)