पुणे :
पी ए इनामदार आय सी टी अकॅडमी तर्फे आयोजित दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण वर्गाचा समारोप गुरुवारी आझम कॅम्पस येथे झाला. भिवंडी येथील शिक्षकाना हार्डवेअर,सॉफ्टवेअर ,इंग्रजी संभाषण,कौशल्ये ,सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण देण्यात आले. उत्तम रित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रथम ३ शिक्षकांना अनुक्रमे १० हजार ,५ हजार आणि ३ हजाराचे पारितोषिक डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ऍकेडमीच्या संचालक मुमताज सय्यद,अरिफ सय्यद ,अंजुम काजळेकर ,आलिया शेख ,आसिया लकडे ,राबिया गोडिकत,नसरीन शेख,शेहनाज शरीफ,अतिया शेख उपस्थित होते